वेदांतभास्कर सद्गुरू प. पू. श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख
सृष्टी, डोळे सारे काही यथास्थित पण अंधार पडला की सर्व व्यर्थ ठरते. दर्शन नाही. सूर्योदय झाला की सर्व स्पष्ट होते. ग्रंथ, वाक्य, वाचक, त्याची बुद्धी इ. प्राप्त असतानाही अर्थाचे आकलन, अर्थ सांगणारा भेटेपर्यंत होत नाही. अर्थातच अर्थावर प्रकाश पाडणारा हवा असतो. साध्या वाङ्मयाबद्दल हे जिथे सत्य आहे, तिथे वेदांतवाङ्मयाबद्दल विधान न करणेच बरे. वेदांतवाक्यांच्या अर्थाचे प्रकाशन श्रीगुरुंची वाणी करते. म्हणून ते वेदांतभास्कर होत. श्रीगुरू प. पू. डॉ. काका - मुरगुडचे - या ज्ञानभास्कराच्या आध्यात्मिक जीवन पैलूवर थोडा प्रकाश टाकण्याचा एक असफल प्रयत्न. सूर्यापुढे काडवाती लावून त्याला ओवाळण्यासारखे.
अभिप्राय
Param Pujya Mandatai Gandhe
विद्याविभूषितांपासून अल्पशिक्षितांपर्यंत, बंधुभगिनी, सर्व वयाचे असे बहुसंख्य शिष्य आहेत, साधक आहेत की जे काकांच्या ठिकाणी त्यांना गुरू म्हणून त्यांच्या पायी नतमस्तक झाले आहेत. ते स्वतःच जीवन धन्य झाल आहे अस समजतात.
काका मुळामध्ये ज्ञानयोगी आहेत. अद्वैत वेदांत हा त्यांचा विषय आहे. आणि म्हणून त्यांच प्रवचन परमार्थातल्या कोणत्याही विषयावर ठेवलं तरी ते अद्वैत तत्त्वज्ञानाची त्याच्यामध्ये हळुवार पेरणी केल्याशिवाय सोडीत नाही.
प. पू. मारुतीबुवा रामदासी
डॉ. हे स्वतः वारकरी संप्रदायाचे आहेत. पण वारकरी संप्रदायात राहून सुद्धा त्यांनी समर्थ संप्रदायाचा उत्तम अभ्यास केला आहे.
त्यांची वेदांत मांडण्याची जी पद्धती आहे ती उत्तम असल्यामुळे ते दोन्ही संप्रदायात खूप मोठे महात्मे म्हणून समजले जातात.
वक्तादशसहस्त्रेषु स्व. श्री. राम शेवाळकर
त्यांनी सर्व भारतीय दर्शनशास्त्रांचा अभ्यास केला व तो केवळ शैक्षणिक पातळीवरून केला नाही, केवळ ज्ञान ग्रहणात्मक दृष्टीने केला नाही व केवळ आपल्याला विद्वत्ता दाखविता यावी या साठीही केला नाही. तो त्यांच्या ज्ञानसाधनेचा भाग होताच पण प्रामुख्याने तो त्यांच्या अध्यात्मिक साधनेचा भाग होता.
हे धर्म संगोपनाचे कार्य काका आपल्या आयुष्यभर करत आले आहेत, धर्म संगोपनाचे जे नर। ते ते ईश्वरी अंशावतार ॥
प. पू. डॉक्टरकाकांचे कार्य
'जो जनांमध्ये वागे । परी जनावेगळी गोष्टी सांगे । ज्याचे अंतरीं ज्ञान जागे । तोची साधू ॥' (दास. ६-१-१८) या वचनाची सत्यता ज्यांच्या रूपाने येते ते डॉ. श्रीकृष्ण दत्तात्रेय देशमुख उपाख्य डॉक्टरकाका. त्यांच्या रूपाने विद्यमान काळातही एका अत्यंत श्रेष्ठ जीवनमुक्त संताचे आपल्याला दर्शन होते. त्यांची व त्यांच्या कार्याची थोडक्यात माहिती देत आहोत.
प. पू. डॉक्टरकाकांचे साहित्य
प. पू. काकांच्या पारमार्थिक वाङ्मयीन संपत्तीचा थाट अवर्णनीय आहे. ब्रह्मसूत्रे, उपनिषदे, भगवद्गीता या प्रस्थानत्रयीवरील भाष्यग्रंथ, शांकर अद्वैत वेदांत तसेच मराठी संत वाङ्मय यांचे सार असलेले अनेक ग्रंथ, विविध पारमार्थिक संकल्पनांचे नि:संदिग्ध विवेचन असलेले अगणित लेख अशी त्यांची ग्रंथसंपदा आहे.
प्रवचने
प. पू. काकांनी वाणीद्वारेही सुबोध शैलीत आणि रसाळपणे समाज उद्बोधन आणि वेदांत विचारांचा प्रसार देश-विदेशात हजारो प्रवचनांतून केला. त्यांच्या प्रतिपादनातून शांकर अद्वैत तत्त्वज्ञान आणि तदनुकूल संतवाङ्मय यावरील त्यांची निष्ठा दिसून येते.